गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज संचलित श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलचा आंतरराष्ट्रीय योग दिन श्री दुरदुंडेश्वर मठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेचे प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांच्या हस्ते ओंकार प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रशालेचे पर्यवेक्षक बी.जी. कुंभार यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. योग विद्याधामचे योग शिक्षक राजाराम चव्हाण व साधना शेरकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाची प्रात्यक्षिके दाखवली. प्रशालेच्या सुमारे ४७५ विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन विविध आसने केली.
प्रशालेचे प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांनी अध्यक्षीय मनोगतातून योग साधनेचा इतिहास सांगितला व योगाचे फायदे सांगून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केले तर क्रीडा शिक्षक बाळासाहेब खरात यांनी आभार मानले.
याप्रसंगी दत्तात्रय लोहार, पार्वती पाटील, महारु भोये, देवनाथ महाले उपस्थित होते.