योग दिनानिमित्त विविध प्रात्यक्षिके
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना हायस्कूलच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्य राखण्यासाठी योगासने करणे महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
शिस्त व संयमाने विद्यार्थी योगाची प्रात्यक्षिके करत होते. योगा करण्यासाठी योगा पोशाख व आसन घेऊन विद्यार्थी आले होते. प्रशालेचे मैदान योगाच्या वातावरणाने प्रसन्न झाले होते. प्रशालेचे क्रीडा शिक्षक बी. एन. वाघमारे यांनी प्रात्यक्षिके करून घेतली. बी. एन. वाघमारे यांनी श्लोक वदन करून घेतले. तसेच इयत्ता दहावीची विद्यार्थिनी तनिष्का शिवणे व चैत्राली वांद्रे यांनी योगा प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये योगासने व सूर्यनमस्काराचे धडे विद्यार्थ्यांनी गिरवले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य आय.पी. कुटिन्हो, पर्यवेक्षक ए. जे. बारदेस्कर, सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.