Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व सरस्वती प्रायमरी स्कूलमध्ये ११ वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन कांबळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग शिक्षक अनिल शिवनगेकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगून योगाची प्रात्यक्षिके दाखवली. प्रशालेच्या  विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन विविध आसने केली. क्रीडा शिक्षक संदेश कोकितकर यांनी मनोगतातून योग साधनेचा इतिहास सांगितला व योगाचे फायदे सांगून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चौगुले यांनी तर महेश पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.