Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला जागृती प्रशालेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील जागृती प्रशालेत राजर्षी शाहू महाराजांच्या 151 व्या जयंतीनिमित्त मराठी विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भितीपत्रकाचे उदघाटन उपमुख्याध्यापक शिवाजी आनावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अनिल मसाळे यांनी लोकराजा राजर्षी शाहू विषयक विचार व्यक्त केले. तर कु. चार्वी कुंभार, वर्षा यादगुडी, प्राची निळपणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्रीरंग तांबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.




यावेळी रवींद्र भंडारे, संजय गडकरी, कल्पना शिंदे यांसह शिक्षक विद्यार्थी यांची उपस्थिती होती. महावीर भोये यांनी आभार मानले. प्रवीण सावंत यांनी सूत्रसंचालन केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.