गडहिंग्लज (प्रतिनिधी): करंबळी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सावित्रीबाई फुले हायस्कूलमध्ये दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व शैक्षणिक साहित्य वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पल्लवी पोवार व महिला हेडकॉन्स्टेबल भारती करडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक माळी होते.
दहावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या अमृता धुमाळ, संचिता साबळे, मधुरा पाटील, संचिता मिसाळ, कुसुम पाटील, वैष्णवी दावणे, समीक्षा माळी, पार्थ सुतार, व इ-8 वी एन.एम.एम.एस शिष्यवृत्तीधारक अथर्व सुतार, स्वरूपा सोनार या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक माळी, उपाध्यक्ष नानासो साबळे, सचिव अक्षय माळी, खजिनदार नारायण शेडेकर, संचालक विजयराव माळी, किसन शेटके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी बक्षीसदाते संभाजी पाटील, शामराव शेडेकर, सुदेश चौगले, अनिल शेरेकर, नंदकुमार सुतार, अल्लाबक्ष मुल्लाणी, दयानंद मोटे, सु भाष कांबळे, संजयकुमार माळी, सचिन पन्हाळकर, बाळासो चौगुले उपस्थित होते. मुख्याध्यापक जयसिंग कांबळे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन पी.आर. एकल यांनी तर पी.एस.मुगळी यांनी आभार मानले.