Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या महात्मा फुले विद्यालयात संयुक्त कार्यक्रम



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व सरस्वती प्रायमरी स्कूलमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची १५१ वी जयंती व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजर करण्यात आला. प्रमुख पाहुणे अशोक नांदुलकर तर अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक मोहन कांबळे होते. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

      

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले. यावेळी आरफा बागवान, सिफा बागवान, दीपक रेडेकर,तन्वी पोटे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर सुभाष सुतार यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन केले.प्रकाश चौगुले यांनी सूत्रसंचालन तर महेश पाटील यांनी आभार मानले.

     

यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी संदेश कोकितकर,कुलदीप देसाई,रमेश कळविकट्टे,सुवर्णा शेवाळे,संचिता जावळे,शिवाजी सुतार, नरसू कांबळे ,श्रीदेवी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.