एकावर गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल
गडहिंग्लज (प्रतिनिधी): एटीएम मशीनमधून आपल्या खात्यावर पाचशेच्या ३५ बनावट नोटा डिपॉझिट करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गडहिंग्लज येथील आकाश रवींद्र रिंगणे याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद त्या बँकेचे ब्रांच ऑपरेशन हेड गौरव खरबुडे यांनी पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, आकाश रिंगणे याने दिनांक १७ जून रोजी रात्री येथील एका बँकेच्या एटीएममध्ये आपल्या खात्यावर पाचशे रुपयांच्या ३५ बनावट नोटा असे मिळून एकूण १७५०० रुपये डिपॉझिट केले. सदर प्रकार बँकेचे ब्रँच ऑपरेशन हेड गौरव खरबुडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रिंगणे यांच्या विरोधात बँकेची फसवणूक केल्याची फिर्याद पोलिसात दिली आहे. याप्रकरणी रिंगणे याच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय सिंदकर करत आहेत.