इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हातकणंगले तालुका गुरव समाज संघटनेचे अध्यक्ष व तमदलगे ता. (हातकणंगले) चे सुपुत्र अनिल शामराव कावडे (गुरव) यांना संविधान प्रचार व प्रसार अभियान अंतर्गत कबनुर-इचलकरंजी येथील श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थे मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मान चिन्ह, फेटा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
स्वागत राहुल वराळे तर प्रास्ताविक अध्यक्षा भक्ती शिंदे यांनी केले. यावेळी रवि रजपुते, प्रमोद पाटील, सुलोचना कटी, चरणदास कांबळे, चंद्रकांत शेटे, स्नेहल गायकवाड, सुनिल म्हाकाळे, अध्यक्षा भक्ती शिंदे, सचिव राहुल वराळे, सचिन वारनुळकर, विशाल असोदे, अजित शिंदे, स्नेहल गायकवाड, बी. जी. देशमुख, अमोल बन्ने, अनिता कावडे, समृद्धी कावडे, ज्योतिबा गुरव, शांनाबाई गुरव, साक्षी गुरव, शुभम कावडे, अविनाश कावडे, शितल गुरव, अमोल गुरव, दादासो गुरव, विनायक गुरव, प्रशांत गुरव यांच्यासह इतर उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त श्री. कावडे हे गडहिंग्लज तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीपाद स्वामी यांचे ते साडू आहेत. आभार विशाल असोदे यांनी मानले.