कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रिन्सेस पदृमाराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ स्मृतीदिना निमित्त प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.एस.आर.पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सौ. एस.एस.इनामदार यांनी करून दिला. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे ॲड. उदयकुमार मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थिंनींनी जिजाऊ सारखेच कणखर, पराक्रमी, तत्वनिष्ठ, चारित्र्य संपन्न बनावे.' उपमुख्याध्यापक आर. जी. देशपांडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
पर्यवेक्षक ए.डी. भोई यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन सौ.व्ही.वाय.देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास शिवाजीराव पाटील -कौलवकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.