मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांची माहिती
अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समिती करणार आंदोलन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गिजवणे येथील श्री.लक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या भ्रष्टाचाराविरोधात व विविध मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक ६ जून रोजी अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने गडहिंग्लज तहसिलदार कार्यालय व प्रांत कार्यालयावर "संघर्ष मोर्चा" काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन संबंधित कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली. यावेळी सागर शिंदे,गणेश कळेकर, मानतेस बन्ने, जनार्दन तोडकर, स्वप्निल कोरी, विजय कडूकर उपस्थित होते.

