Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पावसाळा संपताच जाहीर करा!

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे चंद्रकांत सावंत यांची मागणी 




गडहिंग्लज (प्रतीनिधी) : महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या आणि दिर्घकाळ प्रशासक राज्य असलेल्या कोल्हापूर , पुणे, मुंबईसह सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणुक उद्घोषणा पावसाळा संपताच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यानी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे ईमेल पत्राद्वारे केली आहे.



पत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला ओबीसी आरक्षणाच्या विषयावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यामुळे तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी संपुनही त्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे ह्या 400 पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत. नगरपालिकांमध्ये मुख्याधिकारी आणि महानगरपालिकांत आयुक्त हेच प्रशासक आहेत. इथे प्रशासक राज्य असल्याने मनमानी कारभार सुरू आहे. नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. हे प्रशासक जनतेला अजिबातच उत्तरदायित्व नसल्यासारखे कारभार करताना दिसून येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिर्घकाळ प्रलंबित ठेवणे लोकशाहीला हानिकारक आहे. चार आठवड्यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवलेली असुन 2022 मधील  बांठीया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीप्रमाणे ओबीसी आरक्षणासह पुणे, मुंबई महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चार महिन्यांच्या आत निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत.




सध्या पावसाळा सुरू होत असुन निवडणुका घेणे शक्य नाही‌.पण पावसाळ्यात निवडणूक याद्या अद्ययावत करणे, आरक्षण सोडत व प्रभाग रचना नव्याने करणे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून पावसाळा संपताच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या आणि दिर्घ काळ प्रशासक राज्य असलेल्या कोल्हापूर , पुणे , मुंबईसह सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणुक उद्घोषणा तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी श्री. सावंत यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.