Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करून हा आदेश रद्द करावा!

गडहिंग्लजला प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिक्षकांना  बीएलओ कामातून मुक्त करून हा आदेश रद्द करावा अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या उपशाखेच्यावतीने गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे निवेदनातून केली आहे.




यावेळी अध्यक्ष अध्यक्ष अनिल बागडी व सरचिटणीस अयाज बागवान यांनी महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय दिनांक 1 ऑगस्ट, 2008 व 24 ऑगस्ट 2024 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे लाऊ नये असे स्पष्ट निर्देश असतानासुद्धा काढलेले बीएलओ आदेश अन्यायकारक व शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे असल्याचे मत मांडले. तसेच नुकतेच सुरू झालेले शैक्षणिक वर्ष, यावर्षी पासून लागू झालेले CBSE पॅटर्न, बहुतांश असणाऱ्या एक शिक्षकी व दोन शिक्षकी शाळा, बदल्यांची सुरू असणारी प्रक्रिया असताना, व्याधीग्रस्त व वयस्कर शिक्षकांना आदेश काढल्याचे निदर्शनास आणून दिले.

 


शिक्षक संघाच्या निवेदनाची दाखल घेत तहसीलदार श्री. शेळके यांनी आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ व त्यात बदल केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्याचबरोबर शिक्षकांचे शासकीय कामात असलेले योगदान व यावर्षी होणाऱ्या जनगणनेची प्रक्रिया याबाबत चर्चा केली.




यावेळी शिक्षक नेते मधुकर येसणे, सुभाष निकम,  शिक्षक संघ अध्यक्ष अनिल बागडी, सरचिटणीस अयाज बागवान, मुख्याध्यापक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र खोराटे, जिल्हा प्रतिनिधी जे.डी.पाटील, मुख्याध्यापक शशिकांत नलवडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.