गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे शिंदे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन शहर कार्यालयात साजरा करण्यात आला.
प्रारंभी तालुका प्रमुख संजय संकपाळ, युवासेना चंदगड विधानसभा प्रमुख सुदर्शन बाबर, शहरप्रमुख अशोक शिंदे, शहर संघटक काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे, आनंद दीघे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान, मूकबधिर शालेय विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संजय संकपाळ यांनी गडहिंग्लज नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
यावेळी सागर कांबळे, राहूल खोत, मंथन भडगावकर, विलास पाटील, श्रेयस कांबळे, शिवराज जरळीकर, उदय महाडिक, संतोष पाटील, उदय हळवणकर, चेतन कातकर, वैभव ठोंबरे, वंसत शेटके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.