गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लज तालुका शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने भडगाव केंद्र शाळा येथे मुलांना शैक्षणिक साहित्य तर अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक तानाजी पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास उपतालुका प्रमुख वसंत नाईक, गडहिंग्लज शहर प्रमुख प्रकाश रावळ, सागर कुराडे, मल्लाप्पा चौगुले, सुरेश हेब्बाळे, संजय पाटील, विशाल चव्हाण, संकेत रावण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. अण्णासाहेब गजबर यांनी स्वागत तर पद्मश्री गुरव यांनी आभार मानले.