Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागृती प्रशाला व आर. के. ज्युनिअर कॉलेजमध्ये सहजयोग ध्यान साधना उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी) :आजचे  युग इंटरनेट व मोबाईलचे असून सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात समृद्ध शरीर व खंबीर मनासाठी सहज योग ध्यान साधनाची आवश्यकता आहे.यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती सुधारणा व अभ्यासात प्रगती होते. सहज योग ध्यान धारणामुळे उत्तम आरोग्य, हृदयविकार, डायबेटीस, ब्लड प्रेशर, वातविकार यासारखे रोग व मानसिक ताण तणाव, निद्राशय भ्रम, फिट्स असे अनेक आजार व व्याधी बरे होण्यास मदत होते, असे सहज योग प्रचारक रवींद्र बलगुंदे यांनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून येथील जागृती प्रशाला व आर. के. ज्युनिअर कॉलेजमध्ये सहजयोग ध्यान साधना याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य आय.जी. फुटाणे उपस्थित होते.



स्वागत प्राचार्य श्रीरंग तांबे यांनी तर प्रास्ताविक सचिन मगदूम यांनी केले. योग प्रचारक माळी काका यांनी सहज योग ध्यान साधनेचे महत्त्व विषद केले. यावेळी सहज योग प्रचारक सुरेश आजरी, डॉ. महेश पाटील यांच्यासह प्रा. स्वाती क्षीरसागर, प्रा.विद्या पन्हाळे, प्रा.गुरुलिंग  खंदारे, प्रा.इझाज आजरेकर, सोनाली घोगरे, प्रिया देसाई, संपत सावंत सर, सुभाष तिप्पे उपस्थित होते.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक रक्ताडे यांनी तर क्रीडा विभाग प्रमुख प्रा. दयानंद ग्वाडी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.