Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, गोकुळची निवडणुक हत्तरकी गट ताकदीने लढविणार

हलकर्णी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह  गोकुळ दूध संघाची निवडणूक मोठ्या ताकदीने लढविण्याचा निर्णय दूध संस्थांचे प्रतिनिधी व हत्तरकी गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात एकमताने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्या रेखाताई  हत्तरकी होत्या.                       


प्रारंभी स्व. राजकुमार हत्तरकी, स्व. सदानंद हत्तरकी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वरदशंकर वरदापगोळ,  मलगोंडा पाटील, करंबळी सरपंच अनुप पाटील, तमन्ना पाटील, सिद्धाप्पा कल्याणी ,भास्कर पाटील, सुभाष कोरे यांनी मनोगत व्यक्त केले .एक दिलाने एक मनाने तयारी करून गोकुळची लढाई आपल्याला लढाईची आहे. जिंकायची आहे.  तसेच येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती निवडणूक रेखाताई हत्तरकी यांच्या नेतृत्वाखाली ताकदीनिशी लढण्याचा निर्णय घेण्यात आला.



                                        

यावेळी गोड साखरचे संचालक शिवशंकर उर्फ अप्पी हत्तरकी, गडहिंग्लज तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, वीरशैव बँक संचालिका श्वेताताई हत्तरकी, तनवडी सरपंच बसवराज अरबोळे, उपसरपंच सलीम यमकनमर्डी, माजी सरपंच उमेश इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.