संतप्त महिलांची मोकळ्या घागरी घेऊन पालिकेवर धडक ; प्रशासनाला विचारला जाब
आठवड्याभरात समस्या न सुटल्यास घागर मोर्चा काढण्याचा इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील काळभैरी रोडवरील पाटील गल्लीत अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील संतप्त महिलांनी हातात मोकळ्या घागरी घेऊन पालिका प्रशासनाला जाब विचारला. येत्या आठवड्याभरात सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी यावेळी दिला. या भागात पाईपलाईनचे काम सुरू असल्याने ही समस्या उद्भवत असून हे काम लवकरच पूर्णत्वास नेऊन पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी महिलांना दिले. दरम्यान, याबाबतचे निवेदन माजी नगरसेविका शशिकला पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी पालिकेला दिले.
या निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक दोन मधील पाणी समस्येबाबत वेळोवेळी पालिकेकडे तक्रार करून सुद्धा पाणीपुरवठा अनियमित केला जात आहे. केल्या चार महिन्यापासून पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पालिकेने गांभीर्याने लक्ष घालून ही पाणीपुरवठ्याची समस्या सोडावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. निवेदनावर उर्मिला कदम, उज्वला दळवी, सुमन पाटील, गीता पाटील, वैष्णवी पाटील, मीनाक्षी चनबसनावर, सुषमा पाटील, लक्ष्मी पाटील, श्रद्धा पाटील, शुभांगी कोंडुस्कर, सविता पाटील, सुजाता पाटील, पुष्पा पाटील, मंगल पाटील, मुबारक शेख, अन्नपूर्णा पाटील, शशिकला पाटील, सरिता कोंडुसकर, प्रणाली पाटील, दिनकर पोवार, आनंद पाटील आदींसह इतरांच्या सोय आहेत.