Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाळेत प्रवेश घ्या अन पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून घ्या!

चंदगड तालुक्यातील कुरणी धामापूर ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम




चंदगड : कुरणी -धामापूर (ता चंदगड ) येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा यावर्षीचा घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय  सरपंच संतोष मोरे व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला. याबद्दल कुरणी - धामापूर येथील ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   



जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चांगल्या पद्धतीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असून या शाळा टिकल्या पाहिजे आणि त्यासाठी आपल्या गावातील शाळेत प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला पाठवावे. मातृभाषेतून शिक्षण हे सर्वश्रेष्ठ शिक्षण असून नक्कीच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील व्यक्तिमत्त्व विकासास जिल्हा परिषद शाळेचा मोलाचा वाटा आहे यासाठी पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे  मत सरपंच संतोष मोरे यांनी व्यक्त केले. विद्या मंदिर कुरणी शाळेत येऊन त्यांनी पहिलीला दाखल असलेल्या सर्व मुलांचे कौतुक केले आणि त्यांच्या पालकांचा यावर्षीचा घरफाळा पाणीपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

  


यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनंत केरकर, प्रल्हाद पाटील, सुशील पोटफोडे ,पुष्पा गुडुळकर , प्रमिला मोरे,काजल गुरव, शाळेचे मुख्याध्यापक प्रविण साळुंखे, संतोष जंगले, जान्हवी सूर्यवंशी, गवसे शाळेचे मुख्याध्यापक नामदेव माईनकर ,वनिता हरेर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.