गडहिंग्लज येथील भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
शहरातील पायाभूत सुविधांसाठी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिले निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहराच्या पायाभूत सुविधाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी राजसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांची गडहिंग्लज येथील भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट घेत या संदर्भातील निवेदन त्यांना दिले. निधी मिळवून देण्याबाबत खासदार महाडिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गडहिंग्लजच्या विकासासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.
यावेळी गडहिंग्लज तालुका अध्यक्ष प्रितम कापसे, बाळ पोटे -पाटील, अजित जामदार, सचिन घुगरे, विश्वनाथ खोत, सागर गंधवाले, विक्रम पोवार, सुधाकर गोरुले, राजशेखर पाटील, बसवराज अरबोळे, पिंटू मांगले, अरुण मोकाशी उपस्थित होते.