मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कार्यक्रम
![]() |
मुंगुरवाडी : प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी घरोघरी स्वच्छतेची माहिती देताना. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : पावसाळा सुरू झाला की, डबके साचून डासांची पैदास वाढते. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढण्याचा धोका असतो. डेंग्यू या जीवघेण्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करणे आणि समुदायांमध्ये स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत प्राथमिक आरोग्य केंद्र मुंगूरवाडीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोज चौधरी यांनी व्यक्त केले. त्या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शनपर बोलत होत्या.
डॉ.चौधरी पुढे म्हणाऱ्या डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केला जात आहेत. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे.डेंग्यू हा फक्त एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदार आहे. जर प्रत्येक व्यक्तीने परिसराची घराची स्वच्छता राखली तर आपण डेंग्यू सारखा रोगाचा प्रभावीपणे मुकाबला करू शकतो .प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये घरोघरी भेटी देऊन स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छ विषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक एम.टी.पाटील,एल्.बी.गावडे,एस.एस.राणे, बी. वाय. माळी, संजय कागिनकर, अक्षय रणदिवे, राजेंद्र कांबळे, अनिल नौकुडकर, विरुपाक्ष बेनाडे, स्मिता कोल्हे, स्मिता कांबळे यासह आरोग्य व अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.
लहान मुलांबाबत विशेष काळजी घ्यावी!
लहान मुलांना डेंग्यू होऊ नये. म्हणून विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसल्यास नजीकचे आरोग्य केंद्र तपासणी करून घ्या. आरोग्य केंद्राची डेंग्यू चाचणी सध्या उपलब्ध झालेल्या आहेत.
-डॉ.सरोज चौधरी