Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेऊरवाडी गावात हत्तीचा फेरफटका ; ग्रामस्थांची पळापळ



चंदगड : गेले महिनाभर कर्नाटकातील बेकिनकेरे व महाराष्ट्रातील महिपाळगड परिसरात वावरणाऱ्या चाळोबा गणेश हत्तीने परतीचा प्रवास चालू केला असून आज सकाळी 7 च्या सुमारास चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी या गावामध्ये या हत्तीने फेरफटका मारल्याने ग्रामस्थांची पळापळ झाली.


मार्च व एप्रिल महिन्यात हा हत्ती तेऊरवाडी चिंचणे परिसरात ठाण मांडून होता. या परिसरातील ऊस पिकांचे, केळी व नारळाच्या झाडांचे नुकसान करत या हत्तीने कर्नाटकातील बेकिनकेरे परिसरात मोर्चा वळवला होता. या परिसरात कार, ट्रॅक्टर , बैलगाडी आदि गाड्यांचे प्रचंड नुकसान केले. आज (दि 27) रोजी हा हत्ती तेऊरवाडी गावामध्ये दाखल झाला. येथील कोवाड- तेऊरवाडी रस्त्यालगत फडेवाडी नवीन वसाहतीत असणाऱ्या तलावात उतरून नंतर गावंदर शेतातून डोंगराच्या दिशेने निघून गेला. सकाळी सकाळी गावामध्ये हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. सध्या या हत्तीने आजऱ्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला सुरवात केली असली तरी तेऊरवाडी - हडलगे जंगलात बांबू असल्या ने पुन्हा एकदा हा हत्ती येथे स्थिरावण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.