दिनांक ६, ७, व ८ मे रोजी पार पडणार यात्रा ; विविध कार्यक्रमांचे आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील नौकुड गावची श्रीमहालक्ष्मी देवीची यात्रा ही तब्बल १० वर्षांनी होत आहे. मोठ्या उत्साहात साजरी होत असून दिनांक ६, ७, व ८ मे या कालावधीत पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, आज क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला आहे.
यात्रेनिमित्त कट्टर नौकुडकर ग्रुप आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सरपंच शुक्राचार्य चोथे, ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव, डॉ. शशिकांत कोरे, अरविंद घेवडे, दयानंद गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत घस्ते, अविनाश गुरव, प्रशांत नाईक, संभाजी गुरव, दिगंबर,गुरव, रवी गुरव, प्रमोद गुरव, राहुल कांबळे, रितेश गुरव, ललित घस्ते, प्रशांत गुरव, गौतम गुरव, रमेश पाटील, सर्व क्रिकेप्रेमी उपस्थित होते.