कोल्हापूरच्या न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ
कोल्हापूर : येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वूमन्स कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात छ. शाहू महाराजांना अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाली. सुरुवातीला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लातील मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाचा दैदिप्यमान यशाचा आढावा घेतला व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मधुकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे. फार्मसी क्षेत्रांमध्ये अनेक करिअरच्या वाटा उपलब्ध असून, उच्च शिक्षण सुद्धा घ्यावे असे नमूद केले.
विकास अधिकारी डॉ. संजय दाभोळे यांनी मुलींनी उच्चशिक्षण घेऊन संशोधनांवर भर द्यावा असे प्रतिपादन केले. संस्थेचे चेअरमन डॉ. के.जी. पाटील यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. संस्थेची दारे विद्यार्थिनींना उच्च शिक्षण, संशोधन याकरिता सदैव खुली आहेत, असे सांगितले. यावेळी संचालक विनय पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनीनी आपली आठवण रहावी म्हणून महाविद्यालयास वॉटर कूलर भेट दिली.
संस्थेचे व्हा.चेअरमन डी.जी.किल्लेदार, संचालक वाय.एल.खाडे, व्ही.स.मोरे, संचालिका सौ.सविता पाटील, प्राचार्य सचिन पिशवीकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजश्री पाटील यांनी केले.आभार प्रा.दिव्या शिर्के यांनी मानले. यावेळी सर्व विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.