Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खडी क्रशर विरोधातील लढ्यात शेतकऱ्यांच्या पाठीशी : डॉ. नंदाताई बाभुळकर

हलकर्णीतील खडी क्रशर बाधित शेतकरी कुटुंबीयांची भेट घेत दिला दिलासा 


शेतकरी, क्रशर मालक, वरिष्ठ  अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीची मागणी करणार 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हलकर्णी येथील खडी क्रशर बाधित शेतकऱ्यांच्या लढ्यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. हा प्रश्न पर्यावरणाशी निगडित आहे. या प्रश्नि लवकरच शेतकरी, क्रशर मालक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीची मागणी करणार असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभुळकर- कुपेकर यांनी सांगितले.





हलकर्णी येथील खडी क्रशर बाधित शेतकरी कुटुंबीयांची डॉ. बाभुळकर यांनी भेट घेत या परिसराची पाहणी  केली. क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतीना पडलेले तडे, आटलेले पाण्याचे स्त्रोत, क्रशर मधून निघणाऱ्या धुळीमुळे जनावरांच्या चाऱ्याचे होत असलेले नुकसान आदी बाबींची माहिती शेतकऱ्यांनी डॉ. बाभुळकर यांना देत त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या बारा वर्षापासून या परिसरात असणाऱ्या सात खडी क्रशरमुळे उध्वस्त झालेली शेती, मानवी व पशूंच्या जीवनमानावर  झालेले दुष्परिणाम फारच गंभीर असून या प्रश्नी लढा देणाऱ्या येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण यापुढे खंबीरपणे उभे राहणार असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आपण मागे हटणार नाही असा शब्द डॉ. बाभुळकर यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी खडी क्रशर परिसरातील वसाहती व शेतीची पाहणी केली. धनगर वसाहतीतील पाहणी वेळी या आंदोलनाचे प्रमुख नेते राजगोंडा पाटील उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.