शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्न हलकर्णी महाविद्यालयात बीए भाग १ व २ वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : इयत्ता बारावीचा निकाल कालच जाहीर झाला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालकांना आता पुढील शिक्षणाची चिंता लागली असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कारण हलकर्णी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आपल्या भागातच पदवीचे शिक्षण मिळावे यासाठी तांबळेश्वर शिक्षण संस्थेने महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व शिवाजी विद्यापीठ संलग्न 'हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी' या नावाने हलकर्णी बस स्टँड जवळ महाविद्यालय केले आहे. या महाविद्यालयात बीए भाग एक व दोन या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गडहिंग्लजला करावी लागणारी धावपळ कमी होणार आहे. त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण झालेल्या हलकर्णी भागातील विद्यार्थ्यांनी या सोयीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी केले आहे.
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बऱ्याच मुला मुलींना, महिलांना व गृहिणींना पुढील पदवीचे शिक्षण इच्छा असूनही काही कारणास्तव घेणे शक्य होत नाही. मात्र आता हे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी येथे पदवी शिक्षण घेण्यासाठी नवीन महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. या महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तांबाळेश्वर शिक्षण संस्था संचलित, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न 'हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी' हे महाविद्यालय सुरू झाले आहे. या महाविद्यालयात बीए प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. हलकर्णी परिसर व सीमा भागातील इच्छुकांनी हलकर्णी बस स्टँड जवळील अंकली बिल्डिंग येथील महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी केले आहे.