भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सायबर गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्यालयात"डेडिकेटेड सायबर इंटेलिजन्स युनिट" स्थापन करावे अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सायबर गुन्हेगारी ही आधुनिक जगासमोरील फार मोठी समस्या आहे. डिजिटल पेमेंटच्या युगात ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रत्येक मोबाईल काॅलच्या अगोदर वैधानिक इशारा देणारा "पोलीस, न्यायाधिश,इनकम टॅक्स ,कस्टम,अधिकारी असल्याचे सांगून तुम्हाला खोटे काॅल येत असतील तर घाबरू नका, ते सायबर गुन्हेगार असु शकतात" असा काॅलर ट्यून अनिर्वाय केला आहे, पण हे पुरेसे नाही.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स,मशिन लर्निग, चॅट जीपीटी -4.0 आणि डाटा सायन्सचा वापर करुन सरकारी आणि खाजगी बॅंका, वित्तीय संस्था, सोशल मिडिया संस्था,नियामक संस्था आणि सायबर पोलीस यांच्या समन्वयातून सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे काळाची गरज आहे. त्यातून गतीमान प्रतीसादाची लिंक तयार होइल. सायबर गुन्ह्यांचा तपास वेगाने होईल. सायबर गुन्हेगारी नियंत्रणात येऊन सायबर गुन्न्हेगारांवर कडक वचक बसेल. सायबर इंटेलिजन्स युनिट हा एक समर्पित सिंगल प्लॅटफॉर्म असेल. सीसीटीव्हीच्या जाळ्याला संगणकाच्या मदतीने सायबर पोलीसांशी जोडल्यामुळे तपासात अधिक अचुकता येईल.
याकरिता सायबर गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्यालयात "डेडिकेटेड सायबर इंटेलिजन्स युनिट" स्थापन करण्यात यावे अशी मागणी श्री. सावंत यांनी या निवेदनातून केली आहे.