गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बुगडीकट्टी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील सरकारी व निमसरकारी सेवा बजावत असणाऱ्या सर्व कामगारांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सरपंच दयानंद देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कामगार दिनानिमित्त ध्वजवंदन पंचायत अधिकारी सुजाता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुगडीकट्टी विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक अशोक गडदराम यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तर लीला अर्जुन पाटील यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपसरपंच मायाप्पा धनगर, सदस्य जोतिबा हुबळे, विठ्ठल राजगोळे, वसंत नाईक, रुद्रप्पा देसाई, महसूल अधिकारी मल्लिकार्जुन कळसगोंडा, ग्रामपंचायत अधिकारी सुजाता पाटील, विद्या मंदिर बुगडीकट्टी, आंबेडकर हायस्कूल, गुडलकोप विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व आशा वर्कर, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेवा संस्था, दूध संस्था, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे नेटके नियोजन सरपंच दयानंद देसाई यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कोळवे यांनी केले.