Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय बौद्ध महासभा आजराच्या वतीने समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर संपन्न

श्रामणेर व बौद्धाचार्य प्रशिक्षण घेतलेबद्दल आयुष्यमान भिकाजी कांबळे यांचा विशेष सत्कार




आजरा (हसन तकीलदार ) : दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा आजरा या संस्थेच्या वतीने पोळगाव (ता. आजरा) येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. आजरा तालुका भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जीवन शेवाळे यांच्या माता पिता पुण्य स्मरण दिनानिमित्य या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      


जिल्हाध्यक्ष (दक्षिण)एस. व्ही. ऐनेकर तसेच समता सैनिकचे केंद्रीय शिक्षक संदीप घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता समता सैनिक दलाचे ध्वजारोहण करण्यात आले तर दुपारी भोजनानंतर लाठी काठी व मानवंदना कशी द्यावी याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी समता दलाचा इतिहास व स्थापना याबद्दल इतंभूत माहिती देताना संदीप घोलप म्हणाले की, तरुणांमध्ये शौर्य, आत्मसन्मान, स्वाभिमान व आपापल्या समाजाप्रती जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अंतर्गत एक दिवशीय समता दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 19मार्च 1927 रोजी महाड येथे समता सैनिक दल या निमलष्करी लढाऊ संघटनेची स्थापना केली. वंश, जात, धर्म, वर्ग या आधारावर जी विषमता समाजात निर्माण केली आहे ती नष्ट करण्यासाठी संघर्ष करणे, समतावादी समाज रचना करणे, सामाजिक सांस्कृतिक व इतर कार्यक्रम हाती घेऊन समाजातील तरुणांमध्ये आत्मविश्वास, धम्मचळवळीकरिता त्यागवृत्ती निर्माण करून समता प्रस्थापित होणेकरिता संघर्षाची मानसिकता तयार करणे ही प्रमुख ध्येय उद्दिष्टे समता सैनिक दलाची असल्याचे त्यांनी सांगितले.



यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे उर्फ डी के, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संतोष मासोळे, बी. डी. कांबळे, श्रामणेर व बौद्धाचार्याचे सलग दहा दिवस चिवर परिधान करून केशवपन करून सिद्धार्थ ते गौतमबुद्धांच्या इतिहासाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून आलेल्या आयुष्मान भिकाजी कांबळे व समता सैनिक दलाच्या आजरा तालुक्यातील प्रथम महिला शिरोळ येथे प्रशिक्षण घेऊन आलेल्या सुमनताई कांबळे या सर्वांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.



यावेळी सुनील कामत, गोविंद शेवाळे, परशुराम कांबळे, तुकाराम किणेकर, के. एस. कांबळे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पदाधिकारी, वंचितचे पदाधिकारी, कोरीवडे, हाळोली, हात्तीवडे, पेरणोली, बहिरेवाडी येथील माता भगिनी व बंधू उपस्थित होते. समता सैनिक ध्वजाला सलामी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.