गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाला सन्मान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी गावचे सुपत्र व बुगडीकट्टी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अशोक कऱ्यापा गडदराम यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फौंडेशन व हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी, बेळगाव यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. गोवा राज्यातील साखळी येथील रवींद्र भवनात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक श्री. गडदराम यांचा सन्मान करण्यात आला.
सदर पुरस्कार हा दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक व्यक्तींनाच दिला जातो. महाराष्ट्रातून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट, अतुलनीय कार्य व सेवा केल्याबद्दल मुख्याध्यापक अशोक गडदराम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला विविध दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक श्री. गडदराम यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला.