विविध कंपन्यांच्या मुलाखतीतून 25 विद्यार्थ्यांची निवड
![]() |
महागाव : वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करताना मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज फार्मसी पदविकेच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात झाला. या दिवशी विविध कंपनीचे मुलाखती ठेवून त्यातील पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मयूर चिंचणीकर यांची उपस्थिती होती. शुभेच्छादिनीच नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने विद्यार्थ्यांमधून आनंद व उत्साहाचे वातावरण होते.
स्वागत व प्रस्तावना प्राचार्य डॉ. अजिंक्य चव्हाण यांनी केले. यावेळी विविध विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान याच दिवशी अँटीला हेल्थकेअर व भरारी डिजिटल या कंपनीचे मुलाखतीचे आयोजन करून पंचवीस विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवड करून मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॉलेजचे वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले.
उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून वैष्णवी चव्हाण, साक्षी शिंदे या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्था सचिव ॲड बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ.यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. संजय सावंत, डॉ. डी. बी. केस्ती सह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रा. सचिन पाटील यांनी आभार मानले.