गडहिंग्लज (प्रतिनिधी): शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडे होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवराज पोवार, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, संजय पाटील, बाळू कुंभार, संभाजी यडूरकर, संकेत रावण, श्रीशैल साखरे, सुरेश हेब्बाळे, अशोक लोहार, बबलू सुतार, महेश भोसले, सागर हेब्बाळे, सुमित कोरवी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

