Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भाजपा स्थापना दिनानिमित्त गडहिंग्लजला मजबुत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका व शहर भाजपाच्या वतीने गडहिंग्लज येथे तहसिलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषद विश्रामगृहासमोरील भाजपच्या नवीन कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वात तब्बल दीड कोटीचे सभासद नोंदणी उद्दीष्टपुर्ती निमित्त भाजपच्या स्थापना दिनी मजबुत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचे संपन्न झाले.



रामनवमी निमित्त प्रभु श्रीराम व भारत मातेच्या प्रतिमा पुजनाने 'भारत माता की जय' ,'जय जय श्री राम', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र', 'भारतीय जनता पार्टीचा विजय असो',अशा घोषणा देण्यात आल्या.




या ऑनलाईन संमेलनात नागपूरहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मुंबईहुन मुंबई महानगर अध्यक्ष, सांस्कृतिक तथा आय टी मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांचे स्वागत करून अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी, 370 कलम हटविणे, नोटा बंदी, वन नेशन‌ वन टॅक्स, वन‌ नेशन‌ वन‌ इलेक्शन, नागरीकत्व सुधारणा कायदा, तिहेरी तलाक रद्द कायदा, भारतीय न्याय संहितेसह तीन नवे फौजदारी कायदे, वक्फ सुधारणा विधेयक व लाडकी बहिण योजना,  राज्याच्या व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेवर भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मार्गदर्शन करुन जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे आपण पदाधिकारी कार्यकर्ते असुन त्याचा अभिमान असल्याने समाजातील शेवटच्या घटकाचे उत्थान याचे पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जनसंघ ते भाजप स्थापनेचा इतिहास मार्तंड जरळी यानी उलगडून दाखवला.




कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, महिला शहर अध्यक्षा निलांबरी भुईंबर, महिला मोर्चा शहर सरचिटणीस भारती सावंत, महिला जिल्हा उपाध्यक्षा अर्चना रिंगणे, अनिल खोत, विश्वनाथ खोत, डॉ.संतोष पेडणेकर, संध्या नाईकवाडी, द्राक्षायणी घुगरे, सचिन घुगरे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील, अनिल गायकवाड, संदिप कुरळे, दिपा कुलकर्णी,पुष्पा चव्हाण,व पक्षाचे युवा पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते बंधु भगिनी उपस्थित होत्या. तालुका अध्यक्ष प्रितम कापसे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.