ठाकरे शिवसेनेच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
आठवड्याभराचा अल्टिमेटम ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन तालुकाप्रमुख दिलीपराव माने यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहराच्या सर्वच भागात गेल्या काही महिन्यापासून भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. काही भागात तर या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला यांना घराबाहेर जाणे अवघड झाले आहे. पहाटे फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांनाही तर या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. आंदोलनाचा इशारा देऊनही प्रशासनावर कोणताच परिणाम झालेला नाही. या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आठवड्याभरात उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, संजय पाटील, मंगल जाधव, ॲड. स्नेहल पाटील, सुधाकर जगताप, सुरेश हेबाळे, स्वरूपा पेंडूरकर, शंकर गवळी, मल्लिकार्जुन चौगुले, मनीष हावळ, कृष्णात कांबळे, श्रीशैलापा साखरे, अनिल हलसोडे, संभाजी येडुरकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


.jpg)