बेळगुंदी येथील मनोहर मगदूम यांचे निधन
आज सायंकाळी चार वाजता होणार अंत्यविधी
गडहिंग्लज : बेळगुंदी (ता. गडहिंग्लज) येथील मनोहर मगदूम यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता बेळगुंदी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. जनता दलाचे नेते रमेश मगदूम यांचे ते बंधू होत.
मनोहर मगदुम हे जनता दलाचे नेते स्वर्गीय आमदार श्रीपतराव शिंदे यांचे विश्वासू सहकारी होते. गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना येथे सेक्रेटरी पदावर त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू व अतिशय संयमी व्यक्तिमत्व निघून गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


