सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मोबाईल न वापरण्याच्या सूचना करण्याची मागणी
गडहिंग्लजला शिंदे शिवसेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): खाजगी व सरकारी शाळेतील शिक्षकांना शाळेच्या वेळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गडहिंग्लज येथील शिंदे शिवसेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बालवाडी ते उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी भविष्यात डॉक्टर, वकील यासह अनेक मोठ्या पदावर नोकरी करत असतात. तर समाजात व्यवहारीक ज्ञान देण्याचे काम हे शिक्षक वर्ग प्रामाणिकपणे करत असतात. त्यामुळे समाजात मानाचे स्थान शिक्षकांना दिले जाते. पण नव्या जमान्यात अनेक शोध लागत गेले. त्यात महत्वाचे म्हणजे मोबाईल हा रोजचा अविभाज्य भाग बनला आहे. तासाचे काम मिनिटामध्ये अशा पध्दती होवू लागले. तर लहान मुलांना मोबाईलपासून दूर राहून अभ्यासात लक्ष लागावे त्यासाठी आई वडील, शिक्षक प्रयत्न करत असतात. तर अनेक शासकीय व खाजगी कार्यालयाच्या ठिकाणी असे नियम केले आहे की, सकाळी ११ ते ५ या वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. पण काही तालुक्यातील, शहरातील सरकारी व शिक्षण संस्थेतील शिक्षक वर्ग हे शिकवणे कमी व मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवत आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यात शाळांमधील शिक्षकांना ११ ते ५ या वेळेमध्ये मोबाईल वापरण्यास बंदीच्या नोटीसा काढाव्यात व शाळेच्या वेळेत मोबाईल वापरण्यास बंदी घालावी. अशी मागणी केली आहे.
निवेदनावर शिवसेनेचे शहर संघटक काशिनाथ गडकरी, युवा सेना शाखाप्रमुख सागर कांबळे, विभाग प्रमुख सुदर्शन बाबर, तालुकाप्रमुख संजय संकपाळ यांच्या सह्या आहेत. निवेदन देतेवेळी काशिनाथ गडकरी, सागर कांबळे, विलास पाटील, सचिन करडे, बाळू पाटील, सदाशिव बेल्लद, लक्ष्मण पाच्छापुरे, अशोक गवळी, राजू बांदेकर, निकेतन चव्हाण, ऋषिकेश मूर्ती, राजू माने, अर्जुन खोत उपस्थित होते.

.jpg)
.jpg)