Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला श्री संत बाळूमामा व श्री हालसिध्दनाथ मंदिर सेवा संस्थान येथे प्रवचन सोहळा संपन्न

मेजर विक्रम जगताप महाराज यांनी केले मार्गदर्शन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री संत बाळूमामा व श्री हालसिध्दनाथ मंदिर सेवा संस्थान येथे मेजर विक्रम जगताप महाराज यांचे श्री संत बाळूमामा जीवन चरित्रावरील प्रवचन सोहळा संपन्न झाला.



स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केले. संत बाळूमामांच्या प्रतिमेचे पूजन हनुमंत शिरगुप्पे यांच्या हस्ते, ग्रामदैवत श्री काळभैरव प्रतिमेचे पूजन बसवराज हंजी यांचे हस्ते व बाळूमामा  ग्रंथाचे पूजन मेजर विक्रम जगताप यांच्या हस्ते झाले. प्रथम मुळे महाराजांच्या प्रतिमेसाठी 75 हजार रुपयेची देणगी देणाऱ्या हनुमंत शिरगुप्पे यांचा मेजर विक्रम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर मेजर विक्रम जगताप यांनी  बाळूमामांचे चरित्र कथन सुरू केले. त्यामध्ये जगाच्या उद्धारासाठी बाळूमामांनी घेतलेला अवतार, पट्टणकडोली येथील पारू कुंभार यांना मानलेल्या बहिणीचा प्रसंग व भंडाऱ्यातला जो आनंद आहे तो सर्वांना समाधान, आनंद व परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे, असे गौरवोद्गार काढले. हे सांगताना त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा, ओघवती भाषा पाहून सारे श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक घटना हृदयस्पर्शी भाषेत सांगताना बाळूमामांचा शाळेतला प्रसंग, बालपण सुंदराईची कहाणी व बाळूमामाचे चमत्कारिक जीवन त्यामध्ये भंडारा, चहा, कण्या आंबील यांचा वापर करून भक्तांचा त्यांनी केलेला उद्धार मेजर विक्रम जगताप यांनी सांगितला.




त्यानंतर आशीर्वचनपर भाषणात परमपूज्य महेशानंद उर्फ ईश्वर महास्वामीजी यांनी मेजरने केलेली 18 वर्षाची दिवस सेवा तसेच जीवनात आपण जागे व्हायला हवे कारण निसर्गातील अंधार नष्ट करण्यासाठी प्रकाशाची गरज असते व घरातील अंधार दूर करण्यासाठी दिव्याची गरज असते आणि मनातील अंधकार दूर करण्यासाठी संतांच्या सानिध्याची गरज असते,  भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची गरज असते असे महाराजांनी सांगितले. 




यावेळी प्रवचनाला पखवाजाची साथ महेश ढोबळे महाराज व गायन हरिभक्त परायण सचिन सुतार व विठ्ठल कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, जवाहर घुगरे अमरनाथ घुगरे, राजू पोवळ, रावसाहेब कुरबेट्टी, खातेदार सुधीर पाटील, आप्पासाहेब बस्ताडे, जयसिंग पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले. आभार रमेश रिंगणे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.