Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुगळी वाचनालयाचे कामकाज कौतुकास्पद!

 सौ.  स्वप्नाली वाडकर यांचे प्रतिपादन 






जरळी (वार्ताहर) : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी मुगळी येथील वाचनालयाने केलेले काम निश्चितच  कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय सेवकांच्या पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ स्वप्नाली वाडकर यांनी केले. 



मुगळी (ता. गडहिंग्लज)येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालय भेटी प्रसंगी त्या बोलत होत्या. कोल्हापूर पुरातत्त्व विभागाचे अधिकारी सर्जेराव वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय सेवकांचे पतसंस्थेचे संचालक व ग्रंथपाल कल्लाप्पा धनवडे यांनी केले. गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी यांच्या हस्ते सौ. वाडकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.




सौ. वाडकर पुढे म्हणाल्या वाचनालय फक्त शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता, समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून विविध उपक्रम राबवत आहे. मुगळी वाचनालयाचा आदर्श तालुक्यातील अन्य वाचनालयांनी घ्यावा. ग्रामीण भागातील वाचनालय असूनही स्वच्छ नीट नेटकेपणाने ठेवले आहे. वाचनालयात स्पर्धा परीक्षेची पुस्तके, ग्रंथ निवड चांगले आहे. सुरू केलेली अभ्यासिका विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगितले.




वाचनालय साठी पुस्तके भेट देण्याचे अभिवचन सर्जेराव वाडकर यांनी यावेळी दिले. यावेळी विक्रम शिंदे, प्रवीण शिंदे यांच्यासह वाचक उपस्थित होते. आभार श्रीपाद स्वामी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.