Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कडलगे येथे ८ मे पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा



हलकर्णी (वार्ताहर): श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडलगे येथे बुधवार दि ८ ते १२ मे  अखेर अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 



सप्ताह काळात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, भजन कार्यक्रम होणार आहे. बुधवारी ह भ प राजू पाटील यांचे प्रवचन व किर्तन होणार आहे. गुरुवारी ह भ प सुधाकर शेळ्ळी यांचे प्रवचन व गुरुवर्य ऋषिकेश वासकर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे प्रवचन होणार आहे. ह भ प बाळू पाटील यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी ह भ प राजू पाटील यांचे प्रवचन व ह भ प इराप्पा गोकावी यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. आज रविवारी दिंडी निघणार आहे .माऊलींच्या अश्वाचे रिंगण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने   पस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे  आवाहन आयोजकाच्या वतीने  करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.