Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

योग्य नियोजन, खडतर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते!

उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांचे प्रतिपादन


गडहिंग्लजला जागृती प्रशालेत एन एम एम एस व बी डी एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोणतेही काम बळजबरीने न करता मनापासून केल्यास आनंद मिळतो. आरामदायक जीवन आपणास निष्क्रिय बनवितो. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नसून सदैव शिकण्याची वृत्ती अंगी बनविणे गरजेचे आहे. सर्व घटकांचे सहयोग यशासाठी महत्त्वाच्या असून योग्य नियोजन, खरतर कष्ट आणि प्रयत्नाने यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी केले.



गडहिंग्लज येथील जागृती प्रशालेत पार पडलेल्या एन.एम.एम.एस व बी. डी. एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सतीश घाळी होते. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संपत सावंत यांनी करून दिला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र सलोनी मोहिते, अमृता येजरे, वेदांत पोवार, वेदांत धुंदरे, वेदांत पाटील, तनिष्का गवळी, मयुरी साळुंखे, अभिलाषा देसाई यांच्यासह जवळपास १४० शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, किशोर हंजी, डॉ. एस. एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.




ॲड. बाळासाहेब देसाई, ॲड. धुंदरे यांची भाषणे झाली. डॉ. सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिक्षणाविषयी जागरूकता वाढवून गुणात्मक दर्जा महत्त्वाचा असल्याचे सांगितले. यावेळी गजेंद्र बंदी, ॲड. विकास पाटील, किशोर हंजी, डॉ. एस. एन. शिंदे, विजयकुमार चौगुले, उमेश सावंत, शिवाजी अनावरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी, संपत सावंत यांनी केले. आभार सौ. श्वेता पुंडपळ यांनी मानले.




जागृती प्रशालेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गौरव करताना उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, सतीश घाळी, ॲड. विकास पाटील, किशोर हंजी, डॉ. एस. एन. शिंदे.


 कार्यक्रमाचे व्हिडिओ येथे पहा 👇









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.