Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज विद्या संकुलामध्ये सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांचा ६१ वा वाढदिवस साजरा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलामध्ये सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांचा ६१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ.पी. बी. पाटील उपस्थित होते. 



प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रा. तानाजी चौगुले यांनी केले. या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळी सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांचा सत्कार प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. माजी पदव्यूत्तर विभाग प्रमुख डॉ. एस. जी. मुंज यांनी दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांच्यासाठी 'सौ. क्रांतिदेवी कुराडे स्कॉलरशिप' सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी दरवर्षी पंचवीस हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. यावेळी मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी फार्मसीच्या नव्या विंगच्या इमारतीचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे व संस्थेच्या अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 


             

प्रमुख पाहुणे मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. पी. बी पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजे यासाठी प्रा. किसनराव कुराडे यांनी शिवराज महाविद्यालय वाढविले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून डॉ.अनिलराव कुराडे यांनी नैतिक मूल्ये समोर ठेवून शिवराज विद्या संकुलातून विद्याभिमुख कार्य करीत आहेत. डॉ.अनिलराव कुराडे सरांनी बहुजन समाजातील मुले शिकली पाहिजे ही तळमळ घेऊन शैक्षणिक कार्य करणारे प्रा. किसनराव कुराडे सरांची दूरदृष्टी असलेल्या कार्याचा विस्तार वाढविण्याचे कार्य करीत आहेत हे नक्कीच प्रेरणादायी आहे. असे प्राचार्य पी. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.




अध्यक्षीय भाषणातून प्रा. किसनराव कुराडे यांनी मार्गदर्शन करताना आम्ही स्वतः ला तपासून घेण्याचे प्रसंग आयुष्यात फारच कमी असतात. शिवराज हे आमचे कुटुंब आहे. या संकुलाच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी आपण सतत कार्यरत रहावे यासाठी अंतर्मुख होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपली वाट आणि चाल ठरविताना आपण सर्व एकत्र राहून कार्यरत राहण्याचा आपण समाजासाठी प्रयत्न करूया, असे हे कार्य पुढच्या पिढीने चालवावे व यशस्वी व्हावे ही अपेक्षा प्रा. कुराडे यांनी व्यक्त केली. आपले कार्य समाजासाठी सत्कारणी लावणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले.



डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, माझे वडील बंधू आदरणीय कुराडे सर यांनी व संस्थेचे पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवून आपल्या मार्गदर्शनातून मला खऱ्याअर्थी घडविले आहे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनातून शिवराज विद्या संकुलाला आवश्यक योगदान देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची त्यांनी सांगितले. आपल्यावर वडिलधारी मंडळीनी दिलेली जबाबदारी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. अनिलराव कुराडे यांनी सांगितले.




या कार्यक्रमातून उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, एम. के. सुतार, तानाजी कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, डॉ. महेश चौगुले, डॉ. रंगराव हेंडगे,  डॉ. एस. जी. मुंज, प्रा.पौर्णिमा कुराडे, संतोष पाटील यांनी शुभेच्छापर भाषणातून अभिष्टचिंतन केले. यावेळी विद्या संकुलाचे उपाध्यक्ष श्री के.जी.पाटील, जे. वाय. बारदेस्कर, ॲड.  दिग्विजय कुराडे, नंदनवाडे गुरुजी, बसवराज आजरी, के. बी. पेडणेकर, संचलिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, अकॅडमिक डायरेक्टर डॉ.आर.एस.निळपणकर, ग्रंथपाल श्री संदीप कुराडे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर, प्रा.विक्रम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर, शिवराज विद्या संकुलातील सर्व विभागाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले तर आभार संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.