Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांच्या कोल्हापूर आणि गडहिंग्लज शहरातील संपर्क कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



कोल्हापूर/गडहिंग्लज (प्रतिनिधी): अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा कोल्हापूर शहर तसेच गडहिंग्लज परिसरात जोरदार प्रचार सुरु असून शहरातील महाद्वार रोड, राजारामपुरी, बापट कॅम्प, जाधववाडी आणि गडहिंग्लज परिसरात त्यांचा नागरिकांशी संवाद दौरा झाला. यामध्ये दुकानदार, फेरीवाले तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 




पक्ष उमेदवार श्री खाडे यांनी रस्त्यावर उतरुन नागरिकांशी संवाद साधून प्रचार करण्याचे तंत्र प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच त्यांचे मतदारांशी भावनिक नाते घट्ट होत असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यांना लाभत आहे.




तसेच त्यांचे प्रचार गीत देखील उत्साह वाढवणारे असून त्यांच्यासारखा राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव असणारा, मूलभूत प्रश्नांची जाण असणारा अभ्यासू नेता जो सामान्य कुटुंबातील आपलासा वाटणारा खासदार व्हावा अशी भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.