Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे पाठबळ!

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांची प्रतिक्रिया 


श्री. खाडे यांच्या प्रचारार्थ प्रचार गीताची निर्मिती 






कोल्हापूर : आम्ही गेले दीड वर्ष केलेला जनसंपर्क त्याचबरोबर गेली 28 वर्षे काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठपणे केलेलं काम यामुळे तळागाळातील लोकांशी आपुलकीचे नाते जुळले आहे. त्या बळावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असून सर्वसामान्य माणसांचे पाठबळ आमच्या पाठीशी उभा राहत आहे, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी व्यक्त केली. अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचे ऊस शेतकरी हे चिन्ह आहे.




यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे म्हणाले, सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर  मोठ्या आत्मविश्वासाने सर्वसामान्यांच्या न्यायाची ही लढाई आम्ही लढत आहोत, तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सतत सक्रिय राहून  काम करणारा खासदार मिळेल असा विश्वास लोकांमध्ये निर्माण होताना दिसत आहे. त्याचबरोबर तरुणांचे मोठे  पाठबळ पाठीशी उभा राहत आहे. या सर्वांच्या सकारात्मक पाठबळामुळे आम्ही चांगल्या पद्धतीची लढत देणार आहोत यात काही शंका नाही. 


 

प्रचार गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल 


👇 येथे टच करा आणि पहा प्रचार गीत  https://youtu.be/XKStW_xBVGk

आज आम्ही प्रचार गीत प्रसिद्ध केले असून यामुळे सर्वांचाच उत्साह वाढेल आणि आमचे काम लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या प्रचार गीताला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल असा विश्वास अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.