Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रा.सौ.एल.एम.डिसोझा, प्रशासकीय कर्मचारी सुरेश खोत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलातील संभाजीराव माने ज्युनिअरच्या प्रा. सौ. एस. एम. डिसोझा व  प्रयोगशाळा परिचर सुरेश खोत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. तर प्रमुख पाहुणे टी.के.कोलेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.के.आर.पाटील म्हणून यांची उपस्थिती लाभली.





प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक  प्रा.आशा पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रा.सौ.एस.एम.डिसोझा यांचा संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते, सुरेश खोत यांचा सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य डॉ.के.आर.पाटील, उपाध्यक्ष  जे.वाय.बारदेस्कर, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा.संतोष पाटील, प्रा.सौ.एस.ए.जांगनुरे यांनी आदींनी आपल्या मनोगतातून या दोन्ही सेवानिवृत्तांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयात प्रा.सौ.डिसोझा व प्रशासकीय कर्मचारी  सुरेश खोत यांनी कार्यतत्पर राहून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यामुळे शिवराज विद्या संकुल ज्ञानदानाच्या कार्यात समाजासाठी आजही तत्पर कार्य करीत आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे व्यक्त करून त्यांनी दोन्ही सेवानिवृत्तांना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी प्रा.सौ.एल.एम.डिसोझा  यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, डिसोझा व खोत कुटुंबीय, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्या पाटील  यांनी केले  तर आभार प्रा.संतोष पाटील  यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.