Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फुटबॉल क्षेत्रात करियरच्या संधी वाढल्या : फुटबॉल प्रशिक्षक मंगेश देसाई

गडहिंग्लजला युनायटेड उन्हाळी प्रशिक्षण शिबिर खेळाडूंना मार्गदर्शन   


                                                                                     



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गेल्या दशकभरात भारतीय फुटबॉलने कात टाकली आहे. इंडियन सुपर लिगमुळे (आएएसएल) व्यावसायिकता वाढली आहे. इंडियन फुटबॉल लिगच्या (आय लीग) तीन श्रेणी झाल्या आहेत.  त्यामुळेच फुटबॉल क्षेत्रात केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक, संघव्यवस्थापक अशा दीड डझनाहून अधिक करिअरच्या संधी वाढल्याचे’ प्रतिपादन भोपाळच्या लेक फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक मंगेश देसाई यांनी केले.




येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुरु असणाऱ्या उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिरात ‘फुटबॉल करीयर’  याविषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात श्री. देसाई यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) याठिकाणी डेव्हलपमेंन्ट ऑफिसर तर रियल काश्मिर या आय लिग संघाचेतांत्रिक संचालक म्हणून केलेल्या कार्याची माहीती दिली. 




यावेळी लेक सिटीचे संचालक राज हंस, युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, तानाजी देवेकर उपस्थित होते. श्रीदेसाई पुढे म्हणाले, यंदापासून तृतीय श्रेणी आय लिग स्पर्धा एआयएफएफने सुरु केली. महत्वाचे म्हणजे यात प्रत्येक राज्यातील लीग विजेत्या संघाला स्थान दिल्याने पुर्वी केवळ बंगाल, गोवा आणिकेरळपुरता मर्यादित असणारा फुटबॉल देशभरात सर्वत्र पोहचतो आहे. यामुळे व्यावसायिकफुटबॉल खेळणाऱ्या संघाची संख्या  दीडशेहुन अधिक झाली. त्यात फुटबॉलपटू, पंच, प्रशिक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी, फिजीओ, सामना विश्लेषक, माध्यम व्यवस्थापक, ट्रेनर, अकादमी प्रशिक्षक, सहाय्यक अशी प्रत्येक संघात दीड डझनाहून अधिक संधी आहेत.’सागर पोवार यांनी आभार मानले. यश पाटील यांनी सुत्रसंचलन केले.


फुटबॉलशी स्नेह कायम ठेवा!


नवोदितांनी खेळाडू म्हणून कारकिर्द जरूर घडवावी. मनापासून मेहनत, शिस्त, समर्पण यातून ते साकारू शकेल. पण, त्यानंतरही पंच, प्रशिक्षकापासून व्यवस्थापक, पुरस्कर्ता, खेळाचा हितचिंतक अशा कोणत्याही स्तरावर फुटबॉलशी शेवटच्या श्वासापर्यंत स्नेह कायम ठेवण्याचे वचन श्री देसाई यांनी उपस्थित खेळाडूकडून घेतले.


 व्हिडिओ येथे पहा 👇







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.