Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथील श्री रामलिंग देवाच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी घेतले श्री रामलिंग देवाचे दर्शन 


यात्रा कमिटीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान श्री रामलिंग देवाच्या यात्रेनिमित्त रविवारपासून विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.




रविवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमानी यात्रेला सुरुवात झाली. यात्रेनिमित्त मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी करडी ढोल, बेंजो, ताशाचा निनाद आणि गायनाच्या तालावर पालखी मिरवणूक पार पडली. रात्री महाप्रसादासाठी पाणी भरणे कार्यक्रम पार पडला. रात्री बारा वाजल्यापासूनच महाप्रसादाची जय्यत तयारी करण्यात आली. यावेळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळी अभिषेक घालून  मूर्तीला अलंकारानी सजविण्यात आले होते. सकाळी नूल मठाचे गुरुसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली. स्वामीजींच्या हस्ते नैवेद्य अर्पण करण्यात आला. स्वामीजींच्या हस्ते पूजन झाल्यानंतर महाप्रसादाचे गावातील सर्व देवतांना सवाद्य नैवेद्य देण्यात आला. याप्रसंगी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महिला आंबील घेऊन मंदिरात दाखल झाल्या होत्या. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी रामलिंग यात्रा कमिटीने नेटके नियोजन केले आहे.


 कार्यक्रमाचे व्हिडिओ येथे पहा 👇









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.