Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांच्या चंदगड तालुक्यात गाठीभेटी

चंदगड मतदारसंघातील जनता आपल्या पाठीशी : बाजीराव खाडे


उद्या बुधवार दि. १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता गडहिंग्लज शहरात पदयात्रा काढणार 




चंदगड (प्रतिनिधी) : लोकसभेची रणधुमाळी जोरात सुरू असून कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील नेते, कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून गावपातळीवर प्रचाराचा धडाका लावला आहे. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व भाजप नेते शिवाजीराव पाटील यांची भेट घेतली. तसेच आपली भूमिका स्पष्ट करत आपल्याला पाठिंबा देण्याची विनंती केली.



यावेळी गेल्या २८ वर्षापासून राष्ट्रीय काँग्रेसचे विचार जनमाणसात पोहचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले. पक्षाने साधी दखलही घेतली नसल्याची खंत खाडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. तसेच आपल्याला चंदगड मतदारसंघातून चांगला पाठिंबा मिळत असून सर्वसामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचे खाडे म्हणाले.



ते पुढे म्हणाले, माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या वाट्याला ही परिस्थिती ओढावत असेल तर भविष्यात तुम्हालाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे हीच वेळ असून योग्य निर्णय घेऊन ऊस शेतकरी असलेल्या चित्रा समोरील बटण दाबून आपणास विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.