गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज पॉलीटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षेचा निकाल घोषित झाला आहे. यात मेकॅनिकल विभागाचा शुभम देसाई (९६.६३) टक्के गुण घेत प्रथम तर वेदांत पोटे-पाटील (९३.२४) द्वितीय, संजना सावंत (९२.२९) तृतीय तर आदित्य तेऊरवाडकर (९१ ४५) चतुर्थ क्रमांक मिळवले. तसेच सर्व विभागाचे मिळून दहा विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत .
इतर विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे- कॉम्प्युटर विभागातून श्रेया थोरात, तन्वी पाटील, प्रीती सातवेकर, सिव्हिल मधून प्रज्ञा कदम, निखिल पाटील, मंजुषा चांदेकर, इलेक्ट्रिकल मधून आदित्य तेऊरवाडकर, रामचंद्र गडकरी, निखिल पाटील,मेकॅनिकल मधून शुभम देसाई, वेदांत पोटे-पाटील, प्रमोद परीट, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन मधून श्रावणी केळोजी, अपूर्व मुसंडी, राज जाधव, मेकेट्रोनिक्स मधून श्रेयस मोरे, राजवर्धन शिपुरकर, शुभम पाटील, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी विभागातून संजना सावंत, मयुरी सुतार, कुणाल नाईक हे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या प्रा. आर.एस.पाटील सर्व विभागप्रमुख व शिक्षकांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ.यशवंत चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण यांनी अभिनंदन केले.