आपला पहिला पगार शाळेसाठी देणगी देत निर्माण केला आदर्श
हत्तरगी : धोंडगट्टे (तालुका हुक्केरी) येथील सरकारी मराठी मुलांची शाळेतील अतिथी शिक्षिका संध्याराणी विठ्ठल पाटील यांनी आपला पहिला पगार शाळेसाठी देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
आपल्याच गावातील प्राथमिक शाळेत अतिथी शिक्षिका म्हणून काम करण्याची संधी मिळाली म्हणून आपला पहिला पगार दहा हजार रुपये बँकेत ठेव ठेवून आलेल्या व्याजातून दरवर्षी "आदर्श विद्यार्थी पुरस्कार" दिला जावा या उद्देशाने ही ठेव कायम स्वरूपी ठेवली आहे. याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Nice👍
ReplyDelete