Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीतील विविध संस्थांनी ध्वजारोहण करत साजरा केला प्रजासत्ताक दिन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी येथील विविध संस्थांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक संस्थांच्या ध्वजाला सलामी दिली. एमसीसीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन




आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे ध्वजारोहण नायब सुभेदार प्रकाश नरेवाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदाशिव तोडकर, सलीम जमादार, संभाजी कुरळे, परशराम पाटील, महादेव इंगवले, सदाशिव खणदाळे, करवीर मांगले, शिवाजी व्हनोळी,  महेंद्र तेगनाळे, बसवराज चौगुले, सुबराव नरेवाडी, निंगाप्पा अलदाळे, मारुती नावलगी, गुरुशांत चौगुले उपस्थित होते.



ग्रामपंचायत तेरणी




ग्रामपंचायतीत सरपंच करवीर उथळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. दीपा नरेवाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुसकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.



बसवेश्वर दूध संस्था




बसवेश्वर दूध संस्थेत चेअरमन संजय जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दूंडाण्णा यळमळी, सखाराम नरेवाडी, शिवाजी उथळे, शिवाजी व्हनोळी, शंकर यादगुडी, आप्पासाहेब कोड्ड, रवींद्र नाईक, शिवमल कांबळे, रामदास सुतार, तुकाराम भोई, सचिव करवीर नावलगी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


संगमेश्वर सेवा संस्था




संगमेश्वर सेवा संस्थेत चेअरमन अण्णासाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बसवंत फडके, मल्लाप्पा भंगारी, करवीर नावलगी, बापू जमादार, शंकर निंबाळकर, संपदा इंगवले, वैशाली सुतार, साक्षी चव्हाण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


महालक्ष्मी पतसंस्था 


महालक्ष्मी पतसंस्थेत संचालक रुद्राप्पा भोई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चेअरमन करवीर इंगवले, बिकनसो बजरू, काशाप्पा फडके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


अक्कमहादेवी महिला दूध संस्था 


अक्कमहादेवी महिला दूध संस्थेत गुरुसिद्धया पटदेवरु यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी चनबसाप्पा अगसगी, शिवराम भोई, दूरदुंडी मलकानावर, सचिव सिद्धाप्पा बुध, करवीर खणदाळे, करनाईक गौडाडी उपस्थित होते.


बलभीम दूध संस्था 


बलभीम दूध संस्थेत चेअरमन विनीतकुमार देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मारुती ढब, अजित चौगुले, सुरेश चौगुले, सत्याप्पा मगदूम, भाऊसो देसाई, विठ्ठल मांगले, सचिव प्रकाश फगरे, कल्लाप्पा गडदराम, अर्जुन नाईक उपस्थित होते.


मराठी विद्या मंदिर तेरणी




मराठी विद्यामंदिर तेरणी शाळेत सरपंच करवीर उथळे यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ. दीपा नरेवाडी,  ग्रामपंचायतीचे सदस्य व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.




यावेळी ग्रामपंचायतीने शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच संगमेश्वर सेवा संस्थेकडून शाळेला झांज पथक साहित्य दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानण्यात आले. तसेच मुंबईकर ग्रामस्थ मंडळाकडून खेळाचे साहित्य दिल्याबद्दल सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अध्यक्ष बाबूराव अत्याळे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तेरणी गावचे सुपुत्र व मर्चंट नेव्हीचे चिप ऑफिसर विनायक नरेवाडी यांनी शाळेला खेळाचे साहित्य दिल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. माजी सरपंच प्रा. मोसिन मुल्ला यांच्या हस्ते जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन रमजान अंकली यांनी केले. 




उर्दू विद्यामंदिर




उर्दू विद्यामंदिर येथे सरपंच करवीर उथळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बसवराज बुध, अर्जुन कांबळे, मोहसीन मुल्ला, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले, अहले सुन्नत जमात व मुस्लिम सुन्नत जमातचे सर्व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तेरणी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष बाबुराव अत्याळे व आजी माजी संचालक यांच्यामार्फत शाळेला खेळाचे साहित्य देण्यात आले. याबद्दल शाळेच्या वतीने या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.




ए. आर. देसाई हायस्कूल




अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ध्वजारोहण मुख्याध्यापक डी. वाय. माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षक बी. जी. गाडीवड्ड, सौ. एस. एन. हालबागोळ, बी. एस.गळाटी, ए.आय. नरेवाडी, सौ. एस. एस. सुतार, ए. एस. निर्वाणी, व्ही. एस. निलवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.