गडहिंग्लजला (प्रतिनिधी): येथील सुन्नी जुम्मा मस्जिद येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी झेंडा कट्ट्याचे पूजन माजी प्रेसिडेंट घुडूसाहेब मुगळे यांचे हस्ते तर ध्वजारोहण प्रेसिडेंट मंजूरभाई मकानदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीरांच्या आणि संविधान निर्मात्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन प्रा. आशपाक मकानदार यांनी केले.
यावेळी राजूभाई खलीफ, मौलाना अजीम पटेल, इकबाल शायनावर, झाकीर सनदी, फिरोज मनेर, मुन्ना तपकिरे, निसार मुल्ला, मुस्ताक मुल्ला, सादिक लमतुरे, अमन मुल्ला, जावेद बुडेखान, मस्तान बोजगर, ताहीर मकानदार, निसार पटेल, सिकंदर पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आभार युनूस नाईकवाडे यांनी मानले.